रायगड जिल्ह्याचे रहिवासी युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन..

रायगड जिल्ह्याचे रहिवासी युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन


पनवेल / वार्ताहर - : रायगड जिल्ह्याचे रहिवासी असलेले परंतु काही कारणास्तव युक्रेन देशात गेलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. रशिया आणि युक्रेन देशात सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीतून भारतीय नागरिकांना सुखरूप घरवापसी करण्यासाठी प्रशासनाकडून ही विचारणा करण्यात आली आहे.

           पनवेल तालुक्यातील कोणी नागरिक युक्रेन देशात अडकला असल्यास तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित नागरिकापर्यंत देशाकडून मदत पोहचविण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून मदतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांनी संपर्क साधावाअसे पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी सांगितले.

           युक्रेन आणि रशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक युक्रेन देशात शिक्षणव्यवसायनोकरीपर्यटन आदी वेगवेगळ्या कारणांसाठी अडकून पडले आहेत. अशा नागरिकांची माहिती नातेवाईकांनी जवळच्या तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात ०२१४१२२२०९७८२७५१५२३६३ या क्रमांकावर संपर्क साधून द्यावी. याशिवाय केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयनवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी मदत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहेनागरिकांना इथे संपर्क साधण्यासाठी १८००११८७९७ या टोल फ्री क्रमांकासह ०११२३०१२११३०११२३०१४१०४०११२३०१७९०५ या क्रमांकाशी संपर्क साधावा. situationroom@mea.gov.in या मेल आयडीवरही माहिती देता येणार आहे.

Comments