१४ वर्षाखालील मुलांची लेदर बॉल क्रिकेटसाठी निवड..
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे १४ वर्षाखालील मुलांची लेदर बॉल क्रिकेटसाठी निवड
पनवेल :   रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे 14 वर्षाखालील मुलांची लेदर बॉल क्रिकेट निवड चाचणी 10 व 11 डिसेंबर 2021 रोजी, उरण येथील उरण क्रिकेट अँड स्पोर्टस असोसिएशन यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. 
या निवड चाचणीला चारशे मुलांचा सहभाग लाभला होता. या दोन दिवसीय निवड चाचणीतून एकूण 90 मुलांची पुढल्या फेरीकरीता निवड करण्यात आली व त्यांच्या मध्ये प्रत्येकी 15 जणांचे सहा संघ तयार करून सहा निवड चाचणी सामने खेळवण्यात आले. त्यातून अंतिम निवड चाचणी करिता 48 मुलांची निवड करण्यात आली. त्यांचे प्रत्येकी बारा जणांचे चार संघ तयार करण्यात आले व त्यांचे दोन निवड चाचणी सामने एम सी सी एच सोसायटी मैदान, पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामधून अंतिम 25 जणांची निवड करण्यात आली व त्यातील पहील्या 1 ते 14 जणांची टीम रायगड म्हणून निवड करण्यात आली. उर्वरित 15 ते 20 स्टँड बाय व 21 ते 25 राखीव खेळाडू असतील.
जाॅन्टी गलबले, सुमित झुंझारराव,विनेश ठाकूर,  अजित म्हात्रे यांनी सिलेक्टर व  सुहास हिरवे यांनी कोऑर्डीनेटर म्हणुन काम पाहीले. टीम रायगड आता नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इन्व्हीटेशन लीग टूर्नामेंट 21-22 मध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झाली आहे. आपण सी गटात असून यातील इतर संघ हिंगोली नाशिक व औरंगाबाद आहेत. आपला पहिला सामना सोमवार दिनांक 07 आणि 08/02/2022 रोजी हिंगोली विरुद्ध आहे. त्यानंतरचा सामना नाशिक विरुद्ध 10/11-02-2022 रोजी आहे व गटातील शेवटचा सामना औरंगाबाद विरुद्ध 13/14-02-2022रोजी आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सभासदांकडून आपल्या संघाला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

विवेक बहुतुले सरचिटणीस रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन रायगड
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...
Image