करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी दिला आमरण उपोषणास पाठींबा..
करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी दिला आमरण उपोषणास पाठींबा
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः ग्रामपंचायत करंजाडे येथे सरपंच रामेश्‍वर बबन आंग्रे यांनी येत्या शनिवार दि.29 फेब्रुवारी पासून मराठा आरक्षणा संदर्भात मुंबई येथील आझाद मैदानावर होणार्‍या आंदोलनाला व आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मराठा समाजासह बहुजन समाजाचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. यात जिल्हा तेथे विद्यार्थी वसतीगृह, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला नोकरीस सामावून घेणे, आंदोलकांवरील गुन्हे विना विलंब मागे घेणे, कोपर्डी खटल्यातील गुन्हेगारांना त्वरित शासन होवून न्याय मिळणे, सारथी संस्थेस भरीव आर्थिक तरतूद करून सक्षम करणे, ईएसबीसी, एसईबीसी प्रवर्गातील नियुक्त्या कायम करणे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्‍न कायम सोडविण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे व अण्णासाहेब पाटील विकास मंडळाने कर्ज मर्यादा 10 लाखावरुन 25 लाख करणे या मागण्यांना आमचा जाहीर पाठींबा आहे व आम्ही प्रत्यक्ष आझाद मैदानावर आपल्या सोबत उपस्थित राहून आपणास पाठींबा व्यक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


फोटो ः रामेश्‍वर आंग्रे पाठींब्याचे पत्र देताना मराठा समाजाचे समन्वयक विनोद साबळे व इतर सहकारी
Comments