खारघरमध्ये महिला कावड यात्रा..
विश्वमांगल्य तर्फे प्रथमच या महिला कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात महिला पारंपारिक वेशभूषा करून उत्सव चौकात एकत्रित जमणार आहेत. त्यांनतर कावड यात्रा पुढे शिवमंदिरात पोहोचेल. मंदिरात श्री शिवमहिम्न स्तोत्र पठण व जलाभिषेक शिवजीवर कावडाने केला जाईल. मंदिरासमोरील मैदानावर मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. या भव्य कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर तसेच नगरसेविका व इतर लोकप्रतिनिधिंची प्रमुख उपस्थिती असणार आहे.