अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरीकास पनवेल तालुका पोलीसांकडुन अटक ..
अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरीकास पनवेल तालुका पोलीसांकडुन अटक 
पनवेल, दि.21 (संजय कदम) ः  अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकास पनवेल तालुका पोलिसांनी खारपाडा, आपटा फाटा येथून ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचे विक्री करणार्‍यांचे रॅकेट उघडकीस येणार आहे.
 पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ.जय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, यांनी नवी मुंबई शहर नशामुक्त करण्याचे व अंमली पदार्थ सेवन व विक्री करणा - या इसमाविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचे वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे व.पो.नि रविंद्र दौंडकर यांना आपटा फाटा , खारपाडा , या ठिकाणी एक इसम अंमली पदार्थाची विक्री करणार असलेबाबत गोपनीय बातमीदारमार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन अत्यंत सतर्कतेने , शिताफीने कौशल्यपूर्वक सापळा रचुन आरोपी मुसा सुलतान खान वय 25 वर्षे , यास ताब्यात घेवून त्याचेकडुन खालील प्रमाणे अंमली पदार्थाच्या साठा हस्तगत करण्यात आला . एकुण किमंत 13,25,000 / - रू वर्णन मेथ एम्फेटामाइन याबा नामक अमली पदार्थाच्या एकुण 54.180 ग्रॅम वजनाच्या 530 गोळया सदर इसमाच्या ताब्यात बनावट आधार कार्ड , पॅनकार्ड , जन्मदाखला मिळून आलेले आहे . तो नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतरित्या राहत असुन त्याने वैध प्रवासी कागदपत्राशिवाय अवैध मार्गाने भारत - बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिका - याच्या परवानगीशिवाय भारतात घुसखोरी करून प्रवेश केला तसेच भारतीय नागरीकांना देण्यात येणा - या व नमुद वर्णनाच्या बनावट कागदपत्राच्या आधार घेवून खरी असल्याचे भासवून शासनाची फसवणुक केल्याने त्याचेविरूध्द पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.क्र . 36/2022 कलम एनडीपीएस अ‍ॅक्ट 1985 चे कलम 8 ( क ) , 22 ( क ) सह , भादविसं कलम 420, 465, 467, 468, 471 सह पारपत्र ( भारतात प्रवेश ) नियम 1 9 50 चे कलम 3 (अ ), 6 ( अ ) , परकिय नागरिकांचा कायदा 1 9 46 चे कलम 14 ( अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . अटक आरोपीस मा . प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी , पनवेल यांनी 7 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुरी दिली आहे. पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह , पोलीस सह आयुक्त जय जाधव , पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील , परिमंडळ 2 , पनवेल , भागवत सोनवणे , सहा . पोलीस आयुक्त , पनवेल विभाग , नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौडकर , गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरिक्षक संजय गळवे , पो.हवा . विकास साळवी , पो . हवा महेश धुमाळ , पोहवा  सुनिल कुदळे , पोहवा  अजित म्हात्रे , पोना  पंकज चंदिले , पोना  प्रकाश मेहेर , पोना  जयदीप पवार , पोशि  प्रविण पाटील , पोशि  यादव गावीत या पथकाने केलेला आहे . सदर गुन्हयाचा तपास पनवेल तालुका पोलीस ठाणेमार्फत चालु आहे .
फोटो ः आरोपी संदर्भात माहिती देताना पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व इतर अधिकारी वर्ग
Comments