कर्करोग रुग्णांसाठी कमी खर्चिक अश्या परवडणाऱ्या केमोथेरपी केंद्राचे उद्घाटन..
पनवेल / प्रतिनिधी : - पनवेल मध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या माध्यमातून कर्करोग रुग्णांसाठी कमी खर्चिक अश्या परवडणाऱ्या केमोथेरपी केंद्राचे उद्घाटन २५ फेब्रुवारी रोजी रोटरी सदस्य परेश ठाकूर (सभागृह नेता पनवेल महानगरपालिका) यांच्या हस्ते DRFC माजी प्रांतपाल रो. डॉ. गिरीश गुणे व भावी प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सलील पाटकर यांच्या 'ONCURA ONCOLOGY CARE CLINIC' केतकी हॉटेल शेजारी, लाईन आळी, पनवेल, येथे करण्यात आले.
कॅन्सर सारख्या असाध्य खर्चिक आजारासाठी पनवेलकरांना मुंबई पुणे सारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागत असे आज रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या माध्यमातून 'केमोथेरपी' कमीत कमी खर्चात होण्यासाठी चार बेड सदर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत, त्याबद्द्ल परेश ठाकूर यांनी रोटरी कल्बचे तसेच डॉ. सलील पाटकर यांचे विशेष आभार मानले व पनवेल सह रायगडमधील कर्करोग रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
गरजू कॅन्सर ग्रस्त रुग्णांना अतिशय आवश्यक अशी ही अल्प दरातील केमोथेरपीची रुग्णसेवा असून , उत्तर रायगड जिल्हा मधील हे असे एकमेव केंद्र आहे, असे DRFC माजी प्रांतपाल रो. डॉ. गिरीश गुणे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास नगरसेविका दर्शना भोईर नगरसेवक राजू सोनी,माजी आरोग्य सभापती डॉ. अरुणकुमार भगत, डॉ. विजय पाटकर, डॉ.लीलाधर पाटकर, डॉ.शैला पाटकर, डॉ. क्षितिजा पाटकर, डॉ. संजीवनी गुणे यांचे सह रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. अभय गुरसाळे, सचिव संतोष घोडींदे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.आमोद दिवेकर, खजिनदार शैलेश पोटे, रोटरीचे भावी अध्यक्ष लक्ष्मण पाटील, रतन खरोल, सुदीप गायकवाड, विक्रम कैया, ऋषीकेश बुवा, अनिल ठकेकर, सुनिल गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते.