मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी शिवजयंतीनिमित्त आणली रायगडावरून शिवज्योत..
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी शिवजयंतीनिमित्त आणली रायगडावरून शिवज्योत
पनवेल दि.19 (वार्ताहर)- पनवेल महानगरपालिकेचे मा. उपमहापौर व भाजपा युवामोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सालाबादाप्रमाणे यंदाही शिवजयंतीनिमित्त थेट रायगडावरून शिवज्योत आणली होती.             सदर शिवज्योतीचे पूजन आज सकाळी मा. उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केले व त्यानंतर ती सर्व नागरिकांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत ही शिवज्योत आणण्यात आली. पायोनिअर विभागातील जनसंपर्क कार्यालयाजवळ आकर्षक अशी सजावट करून छत्रपती शिवरायांच्या मूर्ती शेजारी ही ज्योत अखंड तेवत ठेवण्यात आली होती. तिचे पूजन परिसरातील नागरिकांनी व ज्येष्ठ नागरिकांनी तसेच माता भगिनींनी मोठ्या जल्लोषात केले. यावेळी बोलताना विक्रांत पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार प्रत्यक्षात अवलंबविणे गरजेचे आहे. आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचारांची समाजाला गरज आहे. खऱ्या अर्थाने तो रयतेचा राजा असल्याने त्याचे पूजन दररोज प्रत्येकाच्या घरात होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
           फोटोः मा. उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील शिवज्योतीचे पूजन करताना
Comments