पनवेल महानगर पालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांचा सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने विशेष सत्कार.
पनवेल महानगर पालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांचा सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने विशेष सत्कार. 
पनवेल दि ०९(संजय कदम): पनवेल महानगर पालिकेच्या उपायुक्त पदी कैलास गावडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल खांदा वसाहत सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार कऱण्यात आला. 
पनवेल महानगरपालिका उपआयुक्तपदी कैलास गावडे यांची नियुक्ती झाल्या बद्दल पनवेल महानगरपालिका कार्यालय, पनवेल या ठिकाणी त्यांचा सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी शुभेच्छा देताना सदानंद शिर्के, संतोष जाधव, शिवाजी दांगट, ओंकार गावडे, विश्राम एकंबे, बी आर कदम, रमेश बांदल, ओमकार जाधव, विशाल काळे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.


फोटो : कैलास गावडे यांचा सत्कार करताना सकल मराठा बांधव
Comments