शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या अलिबाग- विरार कॉरीडोरच्या पाठपुराव्याला यश..

तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची प्रांताधिकारी कार्यालयात बैठक संपन्न ..

शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास झाली मदत ..

पनवेल / प्रतिनिधी : - अलिबाग – विरार मल्टीमॉडेल कॉरीडोर प्रकल्पाच्या भू- संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून विरोध दर्शविला जात होता. यामध्ये अनेक शेतकऱ्यांमध्ये या प्रकल्पाबाबतची परिपूर्ण माहिती उपलब्ध होत नव्हती. मात्र या प्रकल्पामधील सत्यता शेतकऱ्यांना समजावी यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी समन्वय बैठक आयोजित करण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आज दिनांक ८ फेब्रुवारी रोजी पनवेल प्रांताधिकारी कार्यालयात य बैठकीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करून याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा समजावून सांगण्यात आला. अखेर शेतकऱ्यांना या बैठकीतील हेतु हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे पटल्यामुळे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. 

अलिबाग – विरार मल्टीमॉडेल कॉरीडोर प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला कशा पद्धतीने मिळेल याकडे प्रामुख्याने प्रांत अधिकाऱ्यांनी लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणले. यावेळी शेतकऱ्यांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले होते, त्यामध्ये शेतकऱ्यांचे हट्ट सुद्धा अनेक होते. मात्र यावेळी शासकीय अधिकारी म्हणून प्रांत अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या भावना प्रखरेतेने समोर येत होत्या, मात्र प्रांताधिकारी हे शेतकऱ्यांच्या बाजुनेच असून ते आपल्यासाठी सहकार्याची भावना ठेवत असल्याचे सांगत शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांनी प्रांताधिकारी व शेतकऱ्यांमध्ये योग्य पद्धतीने समन्वय साधला. यावेळी उपस्थित विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्याकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होण्याबाबत विनंती केली. 

प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या समन्वय बैठकीला शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दीपक निकम,  पनवेल तालुका संघटक भरत पाटील,  पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल,  क्रांतिकारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नामदेवशेठ फडके,  विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरीडोर बाधित शेतकरी संघटनेचे अपाध्यक्ष अरुण जळे, वामनशेठ शेळके,  बोर्ले गावचे माजी सरपंच बाळकृष्ण पाटील आदींसह प्रमुख शेतकऱ्यांमध्ये नरेंद्र भोपी,  सुभाष भोपी,  डी.के.भोपी, बबन फडके, सुनील वसंत पाटील,  दीपक पाटील, रमेश फडके,  चंद्रकांत फडके,  अनंता पाटील,  नितीन भोपी,  किसान माळी,  रुपेश पवार, रोशन कडवं,  बाळाराम फडके,  राजेंद्र मेस्त्री,  किशोर पाटील,  प्रसाद पाटील,  लहू पाटील,  बाळाराम ठाकूर आदींसह शेतकरी बांधव उपस्थित राहिले होते.
Comments