नवीन पनवेल कोमसापच्या अध्यक्षपदी गणेश कोळी..
नवीन पनवेल कोमसापच्या अध्यक्षपदी गणेश कोळी
पनवेल दि.१८ (वार्ताहर)- नवीन पनवेल कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी यांची निवड झाली आहे.

           नवीन पनवेलच्या के.आ.बांठीया विद्यालयात प्रा.चंद्रकांत मढवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 2021 ते 2024 या कालावधीकरिता नवीन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली.

        या कार्यकारिणीत उपाध्यक्ष रामदास गायधने, सचिव योगिनी वैदू, सहसचिव प्रा.अजिनाथ गाडेकर, खजिनदार गणेश म्हात्रे, कार्यकारणी सदस्य सुमंत नलावडे, चित्रलेखा जाधव, संतोष सुतार, मंदाकिनी हांडे, विजय पवार, जिल्हा प्रतिनिधी स्मिता गांधी, युवाशक्ती प्रमुख अमोल म्हात्रे, सल्लागार अ‍ॅड. प्रा. चंद्रकांत मढवी, ज्योत्स्ना राजपूत यांची निवड करण्यात आली.

          या कालावधीत नवीन पनवेल कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने कवी, साहित्यिकांसाठी विविध कार्यक्रम, मराठी भाषा दिन, कवी कट्टा, पोपटी कवी संमेलने, साहित्य पुस्तके प्रकाशन आदी विविध उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश कोळी यांनी बोलताना सांगितले. 
Comments