साडूला भेटून गेलेला इसम परतलाच नाही..
साडूला भेटून गेलेला इसम परतलाच नाही
पनवेल, दि.22 (संजय कदम) ः आपल्या साडूला भेटून घरी परत असलेला इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पांडुरंग राजाभाऊ कांबळे (35) असे या इसमाचे नाव असून उंची 5 फुट 5 इंच, बांधा मध्यम, वर्ण काळा सावळा, चेहरा उभट, नाक सरळ लांब असून अंगात लाल हिरव्या रंगाचा शर्ट व जिन्स पॅन्ट तसेच पायात काळ्या रंगाची सॅण्डल त्याचप्रमाणे उजव्या हाताच्या मनगटावर मराठीत राधा असे गोंदलेले आहे. त्याला मराठी भाषा अवगत आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.हवा.मंगेश कदम यांच्याशी संपर्क साधावा.

फोटो ः बेपत्ता पांडुरंग कांबळे
Comments