कै.सौ.मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सप्ताहाचे आयोजन..
पनवेल / प्रतिनिधी : - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त तसेच जागतिक महिलादिनाचे औचित्याने कै. सौ.मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सप्ताहाचे आयोजन श्री विरुपाक्ष महादेव मंदिरात करण्यात आले आहे.
कीर्तन सप्ताहाचे आयोजन गुरुवार दि.३ मार्च ते बुधवार दि.९ मार्च पर्यंत विरुपाक्ष मंदिर, शिवाजी रोड, पनवेल येथे रोज रात्री ९.३० वाजता करण्यात आले आहे, सदर कीर्तन हे विविध शहरातील नामांकित कीर्तनकार करणार आहेत, त्यांची साथ संगत नंदकुमार कर्वे, तबला गणेश घाणेकर, हे करणार आहेत.
क्रांतीचा जयजयकार किर्तन सप्ताहास सर्व राष्ट्रप्रेमी भाविक श्रोत्यांनी मोठया संख्येने व श्रद्धेने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संदीप लोंढे आणि त्यांच्या परिवारा तर्फे करण्यात आले आहे.