पालकत्व परिसंवाद दुधेविटेवरी कॉम्प्लेक्समध्ये संपन्न..
पालकत्व परिसंवाद दुधेविटेवरी कॉम्प्लेक्समध्ये संपन्न

पनवेल, दि.12 (संजय कदम) ः दुधेविटेवरी कॉम्पेक्स  सेक्टर 3 ए, कंरजाडे, पनवेल  येथे  पालकत्व परिसंवाद उंदर राजकोट  गुरुकुल संस्थान, श्री स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल,  नवी मुंबई यांच्या तर्फे आयोजित केला होता.
करंजाडेचे सरपंच रामेश्‍वर आंग्रे आणि  सौ. नंदिनी राजाराम म्हात्रे यांची मुलं गुरूकुल विद्यालय मध्ये शिकत आहे. आपल्या मुलांमध्ये झालेला बदल त्यांना मिळालेले संस्कार हे पाहून पालक या नात्याने त्यांनी हा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपला मुलगा जसा संस्कारात  घडतोय तसेच  इतरांच्या मुलांन मध्ये शिक्षणा सोबत  संस्कार व सुसंस्कृतपणा यावा  या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या परिसंवादामध्ये पालकांनी मुलांशी कसे वागावे याचे योग्य ते मार्गदर्शन साधू तीर्थस्वरूप दास स्वामीजी आणि साधू ब्रह्मस्वरूप दास स्वामीची यांनी केली. मुलांवर चांगले संस्कार घडवताना आपल्या मध्येही थोडाफार बदल करावा लागतो हेही त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी च्या स्वरूपात आणि पीपीटी प्रेझेंटेशन च्या स्वरूपात समजून सांगितले. खूप छान पद्धतीने त्यांनी पालकांना मार्गदर्शन केले. पूर्वी गुरुकुल पद्धतीने जे शिक्षण मुलांना मिळत होते ते फारच चांगले होतं .आत्ताच्या या धावपळीच्या युगामध्ये  आपणच पालक  कुठेतरी कमी पडतोय  का? हेही पाहणे तितकेच गरजेचे आहे . धावपळीच्या आयुष्यामध्ये शिक्षण सोबत संस्कार , संस्कृती, टाईम मॅनेजमेंट, चांगली वागनूक या गोष्टीकडे तितकेच महत्त्व देणे गरजेचे आहे असे नंदिनी राजाराम म्हात्रे यांचे मत आहे आणि त्यासाठीच  हा एक छोटासा उपक्रम राबवला आहे.
Comments