लेडीज सिंघम (कामोठे पोलीस) प्रथम क्रमांक तर क्रियाशील प्रेस क्लब द्वितीय क्रमांकाचे मानकरी. उत्तेजनार्थ बक्षीस झोन -2 टीमला.
पनवेल /प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी विविध प्रकारचे महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. पनवेलमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व न्याय देण्यासाठी अग्रेसर असलेली क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई शिंदे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. या सामन्यांचे उदघाटन सौ ममता प्रीतम म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सौ.ममता प्रीतम म्हात्रे यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आस्वाद घेतला.
यावेळी पनवेल महापालिकेचे उपायुक्त माननीय श्री विठ्ठल डाके, उपमहापौर सौ.सीताताई पाटील, नगरसेवक श्री. गणेश कडू, नगरसेविका सौ.सारीका भगत , नगरसेविका सौ. सुरेखा मोहकर, नगरसेविका सौ.दर्शना भोईर, नगरसेविका सौ.राजश्री वावेकर, नगरसेविका सौ.चारुशीला घरत,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला रायगड जिल्हाअध्यक्षा सौ. आदिती सोनार ,सौ. प्रीती खानविलकर, मा.श्री पुरुषोत्तम (नाना) भुजबळ, मा.सौ. निता माळी, मा .सौ. सुहासिनी केकाणे, ज्येष्ठ पदाधिकारी सौ. शोभा सातपुते , ज्येष्ठ पदाधिकारी सौ.अंजली इनामदार ,सौ. निता मंजुळे ,ऍड सौ.सुलक्षणा जगदाळे, राळे , सौ.रोहिणी पाटील ,सौ वृषाली मिसळ , सौ.रेवतीताई सकपाळ , सौ .मीनाताई सादरे ,सौ.मनीषा देशमुख , सौ सोनाली कुदळे,सौ. प्रभा सिन्हा , सौ.अभिलाषा ठाकूर ,श्री.चंद्रकांत मंजुळे, प्रमोद भगत , मातंगसमाजाचे तालुका अध्यक्ष. श्री सुरेश देढे , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या सामन्यांमध्ये कामोठे पोलीस ठाणे यांचा लेडीज सिंघम ग्रुपने प्रथम क्रमांक तर क्रियाशील प्रेसक्लब पनवेल यांनी द्वितीय क्रमांक तर झोन -2 या संघाने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. यावेळी विजेत्यांना भव्य चषक व बक्षीसांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले तसेच वुमन ऑफ द सिरीज कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांना देण्यात आले तर उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.