तळोजा फेज १ विभागातील पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा ईशारा

 राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा ईशारा


पनवेल / वार्ताहर :  तळोजा फेज   विभागातील पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनाचा ईशारा दिला आहे. सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत अनेकदा निवेदने दिलेली आहेत. परंतु निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देताच काही दिवस पाणी पुरवठा सुरळीत केला जातो. त्यानंतर परस्थिती जैसे थे असते.

          तळोजा विभागाची लोकसंख्या दिवसेनदिवस वाढतच असून गेल्या अनेक महिन्यापासून तळोजा विभागात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने रहिवाशी सोसायट्यांना पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे सोसायट्यांना सिडकोकडून काही लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु नागरिकांना टँकरद्वारे पाणी मिळविण्याकरिता लॉटरीचा खेळ खेळावा लागतो. लॉटरी लागली नाही तर खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागून टँकरचे दूषित पाणी प्यावे लागल्याने आरोग्यास आमंत्रण दिले जात आहेअशा दुहेरी संकटात नागरिक सापडल्याने नागरिकांच्यामध्ये संताप पसरलेला आहे.

            याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सतिश पाटील व जिल्हा उपाध्यक्ष कासम मुलाणी याच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदने दिलेली आहेत. परंतु निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देताच काही दिवस पाणी पुरवठा सुरळीत केला जातो. त्यानंतर परस्थिती जैसे थे असते. त्यामुळे 27 मार्च 2022 पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी नालाजास्तव दिनांक 29 मार्च  रोजी सकाळी 11 वाजता सिडको कार्यालय सीबीडी बेलापुर तसेच पाणी पुरवठा कार्यालय तळोजा, एमआयडीसी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, सुदाम पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष सतिश पाटीलकार्याध्यक्ष शिवदास कांबळे , कार्याध्यक्ष ताहेर पटेल, उपाध्यक्ष (अल्पसंख्याक ऑल इंडिया) फारुक पटेल याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष कासम मुलाणी तसेच प्रदेश सचिव (अल्पसंख्याक) अफरोज शेख याच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे.  


Comments