स्कुटीला अज्ञात वाहनाची धडक, स्कुटी चालकाचा मृत्यू..
स्कुटीला अज्ञात वाहनाची धडक, स्कुटी चालकाचा मृत्यू

पनवेल दि,१९(वार्ताहर):डी पॉईंटकडून जेएनपीटीकडे जाणाऱ्या रोडने पुष्पकनगर ब्रिजवर स्कुटीला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत सुधीर पुंडलिक पाटील (वय 45) घेसरगाव, निळजे यांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनचालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.       
होंडा एक्टिवा स्कूटी क्रमांक एम एच 05 एस 2606 ही घेऊन सुधीर कुंडलिक पाटील  निघाले होते. पुष्पकनगर पुलावर त्यांना पाठीमागून एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनचालक वाहनासह पळून गेला आहे.

Comments