मानवता फाऊंडेशनचा “निरोगी ज्ञानी बालपण” मोहीमेचा प्रारंभ
पनवेल / वार्ताहर : - सक्षम भवितव्य घडवायचे असेल तर सक्षम पिढी घडवायला हवी, हे लक्ष समोर ठेवून मानवता फाऊंडेशन ने “निरोगी ज्ञानी बालपण” (Healthy & Knowledgeable Childhood Champaign) मोहीम सुरू केली आहे. याचा प्रारंभ शनिवार दिनांक ०५ मार्च २०२२ रोजी चाफेवाडी व फणसवाडी या आदिवासी पाड्यापासून झाला.
पी आय एल मुंबई प्रा. लिमिटेड यंदा ५५ वा वर्धापन दिन साजरा करत असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी मानवता फाऊंडेशनच्या मोहिमेला पाठबळ दिले व सामाजिक बांधिलकी जपण्याची आपली जवाबदारी उत्तमरित्या पार पडली. आदिवासी पाड्यावरील मुलांना अन्नदान पोषण पोटली, शैक्षणिक किट, ब्लँकेट्स आणि खावू चे वाटप करण्यात आले. यावेळी पी आय एल मुंबई प्रा. तर्फे तृप्ती कुंदर आणि टीम ने प्रत्यक्ष सहभाग घेतला. व मोहिमेत सहभागी झाल्याचे समाधान, आनंद व्यक्त केला आणि या पुढेही अश्या कार्यात आनंदाने सहकार्य करू अशी हमी मानवता फाऊंडेशन ला दिली.
आम्ही नेहमीच जनहितार्थ कार्यक्रम राबवत असतो आणि ही मोहीम आम्ही अशीच पुढे चालू ठेवू, असे संस्थापक अध्यक्ष संजयजी पवार यांनी सांगितले. कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी लवकरच आम्ही पालघर आदिवासी भागात ही मोहीम राबवू हे जाहीर केले. राष्ट्रीय संयोजिका शितल मोरे यांनी कंपन्या, राजकारणी आणि उद्योजक यांना आवाहन केले आहे की या मोहिमेत भर भरून सहकार्य कराव, सहभागासाठी त्यांनी मानवता फाऊंडेशन कार्यालयात संपर्क करावा.
या मोहिमेत स्नेहा सांगळे, आथांश सांगळे, स्वाती पाटील, सपना शिंदे, अक्षय कोळी, रोशन कोळी, तुषार ढीकुले आणि डॉ. अफजल देवळेकर सरकार, आदी सहभागी होते.