आई व सावत्र वडीलांविरोधात गुन्हा दाखल..

आई व सावत्र वडीलांविरोधात गुन्हा दाखल

पनवेल दि,१९(वार्ताहर): 17 वर्षीय मुलीला शिक्षण सोडून बारमध्ये कामाला जा असे सांगून सतत मारहाण व घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आई आणि सावत्र वडीलांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            
सतरा वर्षे तरुणी पनवेल परिसरात राहत असून दहावी इयत्तेत शिकते. तिची आई व सावत्र वडील हे मागील काही महिन्यांपासून तिला शाळा सोडून दे आणि बारमध्ये जाऊन काम कर व पैसे कमव असे सांगत होते. मात्र तिला शिक्षण पूर्ण करायचे असल्याने कामाला जाणार नाही असे तिने सांगितले. यावेळी आई तिला मारहाण करायची तसेच आई व सावत्र वडील घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करायचे. त्यांच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून ती तिच्या मैत्रिणीच्या घरी निघून गेली होती. पोलिसांनी शोध घेऊन आई-वडिलांना समजावले व घरी घेऊन जाण्यास सांगितले. मात्र आईने तिला घरी घेऊन जाण्यास नकार दिल्याने ती मावशीकडे राहायला गेली. मावशी तिला पनवेलला घेऊन आली. मात्र आईने घरी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आई शारून आंग्रे व सावत्र वडील राहुल गोसावी (वय 45) यांच्याविरोधात पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Comments