नक्षत्र 2022 विद्यार्थ्यांच्या कला गुणाचे उत्कृष्ट व्यासपीठ - प्राचार्य डॉ.डी आर सुरोशे
पनवेल /प्रतिनिधी :
सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खारघर मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन नक्षत्र 2022 चे आयोजन करण्यात आले होते. जोगवा या कला नृत्यास प्रथम पारितोषिक देण्यात आले.
क्रिकेटमध्ये तृतीय वर्ष सिव्हील हा संघ प्रथम विजेता ठरला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी अकाउंट सेक्शन हा संघ प्रथम विजेता ठरला. विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यासाठी प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून खारघर पोलीस स्टेशनचे धीरज पाटील तसेच खारघर पत्रकार संघाचे संस्थापक , सचिव , सा.सार्थ लोकनिती संपादक संतोष वाव्हळ व माझं साम्राज्य न्युज आणि परिणीता सोशल फाऊंडेशनच्या संचालिका साक्षी सागवेकर मॅडम उपस्थित होत्या.