मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी मार्गी लावली श्री सहयोग सोसायटीची समस्या..
पनवेल : - प्रभाग १८ मधील लोखंडी पाडा येथील श्री सहयोग सोसायटीच्या आवारातून महानगरपालिकेचे गटर वाहते, ते गटर अरुंद आणि कमी खोलीची असल्याकारणाने सांडपाणी वाहत नव्हते. हे छोटे गटर मुख्य नाल्याला जोडले गेले आहे, परंतु मुख्य नाल्यात कचरा आणि माती पडून पाणी जाण्याचा मार्ग अडला होता.या मुख्य नाल्यातून सांडपाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे छोट्या गटर मधील पाणी उलट फिरून साचून गेले होते.सांडपाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती व त्यामुळें डासांचा प्रादुर्भाव वाढला होता, विशेष करून तळमजल्याच्या लोकांना याचा जास्त त्रास जाणवत होता.
या विषयावरून श्री सहयोग सोसायटीच्या रहिवाशांनी प्रभाग १८ चे कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांची भेट घेतली आणि या विषयाची माहिती दिली.नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्राधान्य देणारे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित साचलेल्या सांडपाण्यावर फवारणी करून घेतली.महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बोलून घेतलं तसेच तातडीने सफाई करून घेण्यासाठी पत्र दिले.महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी मुख्य नाल्यातील माती आणि कचरा साफ करून घेतला आणि पाण्याचा प्रवाह मोकळा केला,याच बरोबर छोट्या गटारातील गाळ काढून घेण्यात आला व सोसायटीच्या मागील बाजूस सुद्धा सफाई करून घेतली.मुख्य नाल्याची सफाई केल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ लागला आणि तुंबलेले पाणी ओसरले.
प्रभागातील नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी नेहमीच नगरसेवक विक्रांत पाटील हे अग्रेसर राहतात त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.