रोटरी आयोजित गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे मोफत तपासणी शिबीर संपन्न..
रोटरी आयोजित गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे मोफत तपासणी शिबीर संपन्न
 
पनवेल / प्रतिनिधी : -  शुभ द ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, पनवेल होरायझन, खारघर मिडटाऊन व कलंबोली_ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन रविवार दिनांक १७ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आले होते.
परिसरातील सुकापूर, आसूडगाव, अष्टविनायक हॉस्पिटल खांदा कॉलनी, नविन पनवेल आणि नील आशिमा करंजाडे या  सर्व ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० यावेळेत पार पडले. एकूण ५० पेक्षा जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. कॉल्पो विजनच्या डॉ. अंजली तळवलकर या मुंबईहून तपासणीसाठी त्यांच्या टीमसह येथे आल्या होत्या.
या शिबीरात स्तनांमध्ये असलेल्या गाठी, पँप स्मिअर टेस्ट आणि स्त्री रोग तज्ञ यांकडून तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी समज गैरसमज आणि कॅन्सर होऊ नये यासाठी घेऊ लागणारी काळजी यावर डॉ. अंजली यांनी सर्व महिलांचे समुपदेशनही केले.
रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे अध्यक्ष रुपेश यादव, पास्ट प्रेसिडेंट रो प्रदीप ठाकरे, रो विजय गोरेगांवकर एजी मधुकर नाईक, खारघर मिडटाऊन चे अध्यक्ष डॉ. किरण कल्याणकर, आदींची यावेळी विशेष उपस्थिती होती.
Comments