सिडकोच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला महाविकास आघाडीसह ग्रामस्थांनी केला विरोध...
 महाविकास आघाडीसह ग्रामस्थांचा विरोध..

पनवेल दि.२६ (वार्ताहर) : कळंबोली वसाहतीमधील काही ठिकाणी असलेले बांधकाम पाडण्यासाठी आज सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक आले असता त्याला आज महाविकास आघाडीसह ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. 

शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, समाजवादी पार्टी आदींच्या महाविकास आघाडीने आज सिडकोच्या कारवाईला विरोध करत कारवाई थांबवली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेवक गोपाल भगत, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, शिवसेना महानगर समन्वयक दीपक घरत, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, शहर प्रमुख डी. एन. मिश्रा, शहर संघटक अरविंद कडव, शहर समन्वयक गिरीश धुमाळ, खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के यांच्यासह मोठ्याप्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. जी जागा सिडकोकडे अद्याप हस्तांतरण झालेली नाही त्या जागेवर सिडको आपला हक्क सांगत बांधकामे कसे काय तोडू शकते असा सवाल स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांनी केला तर जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सुद्धा आक्रमक भूमिका मांडत कोणत्याही परिस्थितीत ही कारवाई करून देणार नाही असा इशारा दिला तर सुदाम पाटील यांनी सुद्धा प्रथम भूमिपुत्रांची देणी सिडकोने द्यावीत मगच अतिक्रमण पाडण्यास यावे असे सांगितले. ग्रामस्थ आक्रमक होताच परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील व कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी आक्रमक जमावाला शांत करत बेकायदेशीर गॅरेज, जाहिरातफलक व मोबाइल टॉवर यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना सिडकोच्या अतिक्रमण पथकाला केल्या असता स्थानिक भूमिपुत्रांनी ही कारवाई करण्यासाठी काही दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली.
 

फोटो : सिडकोच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला ग्रामस्थांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी विरोध करताना
Comments