शुक्रवारपासून आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा थरार ; प्रो कबड्डीतील नामवंत खेळाडूंचा समावेश

विजेत्या संघास ०१ लाख रुपये व आमदार चषक; मान्यवरांची लाभणार मांदियाळी 


पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने दिनांक २२ ते २४ एप्रिल पर्यंत 'आमदार प्रशांत ठाकूर चषक' भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा धरणा कॅम्प येथे होणार आहे.  या स्पर्धेत प्रो कबड्डीतील नामवंत खेळाडूंचा समावेश असणार असून कबड्डीचा थरार क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 
          स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी ०५ वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार आशिष शेलार, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सह कार्यवाह आस्वाद पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, उप महापौर सीता पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बाल कल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, प्रमिला पाटील, अरुणा भगत, वृषाली वाघमारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, राम वरदायिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर बक्षिस समारंभ माजी मंत्री व विद्यमान आमदार रविंद्र चव्हाण व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते २४ एप्रिलला होणार आहे. 
           या स्पर्धेतील विजेत्या संघास ०१ लाख रुपये व आमदार चषक, उप विजेत्या संघास ५० हजार रुपये व आमदार चषक तर उपांत्य विजयी दोन्ही संघास प्रत्येकी २५ हजार रुपये व आमदार चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीरास दुचाकी मोटार सायकल, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड प्रत्येकी १० हजार रुपये तर पहिला व दुसरा दिवस मानकरीला प्रत्येकी ०५ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शेखर कदम, सचिव प्रशांत कदम, खजिनदार जितेंद्र कदम यांनी केले आहे.
Comments