गुरुवर्य उमा सुरेश जोगळेकर व डाॅ. सुरेश जोगळेकर यांचा सपत्निक सत्कार..
मुंबई / वार्ताहर : - जुनी एस एस सी अकरावी १९७५ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गुरूवर्य शिक्षिका सौ. उमा सुरेश जोगळेकर, व डाॅ. सुरेश जोगळेकर यांंचा त्यांच्या चंद्रशेखर सोसायटी येथील घरी जाऊन पुष्पगुच्छ, शाल,देऊन मिलिंद जाधव व पत्नी वर्षा जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनंत दाभोळकर, निर्मला परब-शेट्ये, निर्मला प्रभू-पै, स्मिता सावंत-मोरजकर, सुरेंद्र मोरजकर, अशोक घाडगे, सतीश मोरे, संदिप कामत, विलास पाटणकर सुनील कांबळे, आदी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी ४८ वर्षानंतर प्रथमच भेटले होते.
यावेळी शाळेतील आठवणींना उजाळा दिल्याने सर्वानाच आनंद झाला. सगळ्यांच्या आठवणीत जोगळेकरबाईनीही भाग घेऊन मोठी रंगत आणली. यावेळी सर्वानुमते ठरवून ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सामुदायिक गेटटुगेदर करण्याचे निश्चित करण्यात आले.