'शिवसंपर्क' अभियानांतर्गत नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण व कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान..
कोविड योद्धा पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवारांचा सन्मान..
पनवेल / प्रतिनिधी : -  शिवसेना पनवेल, नविन पनवेल आणि खांदा कॉलनी यांच्या वतीने "शिवसंपर्क" अभियानाची सभा पनवेल येथील बेल्लेझा बँक्वेट हॉल येथे खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 
या सभेस पनवेल मधील व्यापारी, वकील, डॉक्टर, समाजसेवक, शिक्षक व रेल्वे संघटनांनी मांडलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. 
या संघटनांच्या प्रमुखांनी यावेळी निवेदने देऊन त्यांच्या भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. प्रश्नोत्तराच्या या सभेत नागरीकांच्या जास्तीत जास्त समस्या निवारण्याचा प्रयत्न करण्यात आला. उर्वरित समस्यांबाबत संबधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निवारण करण्यात येईल असे आश्वासित केले.
व्यापारी वर्गाला तसेच सर्व सामान्य नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
तसेच कोविडच्या संकट काळात उत्कृष्ट काम केलेले सन्माननीय डॉक्टर, परिचारिका, स्वच्छ्ता दुत, स्मशान भूमीतील कर्मचारी अशा अनेकांचा यावेळी "कोविड योद्धा सन्मान पुरस्कार" देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर संघटक प्रथमेश सोमण, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, पनवेल शहरप्रमुख  प्रवीण जाधव, महिला आघाडी, शिवसैनिक, पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Comments