रिक्षा चालक रुपेश खांदेकर यांनी दिले तडफडणाऱ्या पक्षाला जीवदान..
रिक्षा चालक रुपेश खांदेकर यांनी दिले तडफडणाऱ्या पक्षाला जीवदान..

पनवेल /प्रतिनिधी
सध्या उष्णतेचा चा तडखा माणसासोबत पक्षाला बसताना दिसून येत आहे. पावसाळा जवळ येत असल्याने तापमानात वाढ होत आहे, नवीन पनवेल येथील सेक्टर 19 परिसरात  वाढत्या तापमाना मुळे रस्त्यावर पक्षी तडफड करत पडला असता अनेक जण येणारे जाणारे बघ्याची भूमिका घेताना दिसत होते रिक्षा व्यवसाय करणारे रुपेश खादेकर  यांना तडफडत असलेला पक्षी दिसल्या बरोबर जवळ जाऊन पक्षाला उचलून घेऊन पाणी पाजले थोडया वेळाने पक्षाची तडफड कमी झाल्यावर त्याला सुरक्षित ठिकाणी त्याला ठेऊन जीवदान दिल्याने रिक्षा चालक रुपेश खांदेकर यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे, लहान पणा पासून पक्षी प्राणीची आवड असल्याने रिक्षा व्यवसाय करत असताना अनेक वेळ्या पक्षी विविध प्राणी उन्हाळ्यात रस्त्यावर पडलेले दिसले कि त्यांना पाणी पाजत सुरक्षित जागेवर ठेवत असतो असे आमच्या प्रतिनिधी शी बोलताना रुपेश खांदेकर यांनी सांगितले.
Comments