विद्यार्थी वाहक संस्था पनवेलची प्रथम जनरल सभा उत्साहात संपन्न..

अध्यक्षपदी पांडुरंग हुमणे यांची सर्वानुमते निवड..


पनवेल वैभव : -  अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज मंगळवार ३मे रोजी संस्थेची २०२२/२०२३ ची पहिली 'जनरल सभा' जनसेवा आश्रम हॉल खांदा कॉलनी नवीन पनवेल येथे संपन्न झाली. 

गेले दोन वर्ष COVID-19 मुळे विद्यार्थी वाहतूक व्यवसाय संपूर्ण बंद होता त्यामुळे यापुढील वाटचालीचे नियोजन आणि उपाययोजना तसेच येणाऱ्या अडीअडचणी याविषयी विचार विनिमय करण्यात आला, यावेळी आजच्या जनरल सभेला मोठ्या संख्येने सभासद हजर होते

सन २०२२ ते २०२७ करिता संस्थेच्या नवीन कार्यकारणीची निवड झाली यामध्ये पांडुरंग सदाशिव हुमणे यांची एक मताने चौथ्यांदा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, उपाध्यक्ष-ज्योतीबा रायकर, सचिव- बन्सीलाल तळेकर, खजिनदार किसन रौंधळ यांची तर कार्याध्यक्षपदी राजेश भगत, उपखजिनदार - मारुती खांबल , उपसचिवपदी- शरद मारूती घुले तसेच अमित कांबोज यांची एक मताने निवड करण्यात आली.

सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी संचालक मंडळ तसेच उप संचालक मंडळ या सर्वांचे संस्थेच्या सभासदांकडून अभिनंदन करण्यात आले. 
 त्याचप्रमाणे COVID-19 मध्ये केलेल्या सामाजिक कार्याबद्दल संस्थेच्या वतीने शरद मारुती घुले यांचा सन्मान करण्यात आला.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...
Image