आरसीएच कार्यक्रमांत संपूर्ण राज्यात पनवेल महानगरपालिकेचा दुसरा क्रमांक..
पनवेल महानगरपालिकेचा दुसरा क्रमांक

पनवेल,दि.18: दिनांक 12 व 13 मे रोजी आरोग्य विभाग संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या यशदा येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत पनवेल महानगरपालिकेचा आरसीएच (प्रजनन  बाल आरोग्य कार्यक्रम) कार्यक्रमांमध्ये राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये दुसरा क्रमांक आला असल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांचे अभिनंदन करण्यात आले. 
     महापालिकेच्यावतीने पल्स् पोलिओ, लहान मुलांचे लसीकरण, टीबी, क्षयरोग निर्मुलन, कुष्ठरोग मोहिम, ॲनिमिया मुक्त भारत, आरोग्य शिबीर, जंतनाशक कार्यक्रम ,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, भरारी पथके, प्रधानमंत्री मातृत्व अनुदान योजना, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम असे अनेक आरसीएच कार्यक्रम उत्तमरित्या राबविले जातात. या सर्व कार्यक्रमांचे मुल्यांकन निती आयोग इंडिकेटर परफॉमन्सद्वारे केले जाते. या मुल्यांकनामध्ये पनवेल महानगरपालिकेचा आरसीएच (प्रजनन  बाल आरोग्य कार्यक्रम) कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये पनवेल महानगरपालिकेने दुसरा क्रमांक मिळविला आहे. 
         वैद्यकिय आरोग्य विभागाच्या या कामगिरीबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनीही  मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांच्याबरोबर सर्व वैद्यकिय आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
Comments