टेम्पोसह ५ लाख १६ हजार रुपये किंमतीचा बेकायदेशीर गुटख्याचा साठा हस्तगत..


पनवेल तालुका पोलिस पथकाची कामगिरी

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील सोमटणे रेल्वे फाटकाजवळ एका टेम्पोत बेकायदेशीररित्या साठा केलेला 5 लाख 16 हजार 650 रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेतला आहे.
या संदर्भात खास बातमीदाराकडून वपोनि रवींद्र दौंडकर यांंना माहिती मिळाली की, एका टेम्पोमध्ये बेकायदेशीररित्या दोन इसम आरोग्यास अपायकारक असा प्रतिबंधीत अन्न पदार्थ व मानवी शरिरास घातक लोकजिवीतास धोका निर्माण करणार्‍या प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर, सहा.पो.नि.विवेक भोईर, सहा.पो.नि.धनश्री पवार, पो.ना.गणेश सांबरे व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन त्या टेम्पोला ताब्यात घेतले आहे व त्यामध्ये 5 लाख 16 हजार 650 रुपयाचा गुटखा हस्तगत केला आहे. व त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 188, 272, 273, 328, 34 सह अन्न सुरक्षा मानदे अधिनियम 2006 मधील कलम 26 (2) (आय), 26 (2) (आयव्ही) व कलम 27 (2) (ई), 59 (2) प्रमाणे  कारवाई केली आहे.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image