सोन्याचे बिस्कीट कमी दरात देतो सांगून व्यावसायकाची केली ३९ लाखांची फसवणूक
पनवेल,दि.२२(वार्ताहर): कमी दरात सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून एका व्यावसायकाची एकोणचाळीस लाखाची फसवणूक झाल्याची घटना खारघर मध्ये घडली आहे
मिलिंद वटारे (वय ४९) रा. पुणे , यांना कमी दरात सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून खारघर येथे गुरुदत्त हॉटेल घेऊन जाऊन एक किलो वजनाचे सोन्याचे बिस्कीट दाखवून त्यांच्याकडून एकोणचाळीस लाख रुपये रोख रक्कम घेऊन सोन्याचे बिस्कीट न देता पोलिसांची रेड झाल्याचे भासून काही अज्ञात इसमांनी त्यांची फसवणूक करून, सदर रक्कम घेऊन ते पसार झाल्याने या बाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.