खांदेश्वर रेल्वे स्टेशन ते खांदा कॉलनी,नवीन पनवेल या मार्गावर बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन..

बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन ..

 

पनवेल खांदा कॉलनी ते खांदेश्वर रेल्वे स्टेशन जाणाऱ्या प्रवासाची सख्या ५ हजार हुन आधिक आहे. तसेच या भागात रिक्षा मीटर प्रमाणे सुरू नसल्याने प्रवास खूप महाग झाला आहे. शिवाय खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात पार्किगसाठी जागा उपलब्ध नसल्याने स्वतःची गाडी असूनही रिक्षावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे खांदेश्वर रेल्वे स्टेशन ते खांदा कॉलनीनवीन पनवेल या मार्गावर बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. 

      पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे प्रवास महागला आहे. खांदा कॉलनी-नवीन पनवेल मधील बस सेवा परत सुरु करावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन मंडळचे व्यवस्थापकाना अखिल भारतीय छावा संघटना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. आधी सुरु असलेले ५९ नंबरची बस पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन नवीमुंबई परिवहनच्या वतीने देण्यात आले

बस मार्ग हा पनवेल रेल्वेस्थानक पासून अभ्युदय बँकबांठिया विद्यालयकालिकामाता मंदिरअयप्पा मंदिरतेरणा हॉस्पिटलआदई सर्कलशिवम आर्किटतलावसूर्यदर्शन सोसायटीआदई फाटाडॉ.आंबेडकर उड्डाणपूलपेट्रोल पंपआयकर ऑफिसमोठा खांदा ते खांदेश्वर रेल्वेस्थानकापर्यंत असेल. 

यावेळी अखिल भारतीय छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसाद परब, पनवेल अध्यक्ष प्रविण जठारशशी नायर आणि महिला संघटक सुमती सरगर उपस्थित होते.

Comments