गरजेपोटी घरांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कपात करावी ; पनवेल उरण महाविकास आघाडीची मागणी
पनवेल उरण महाविकास आघाडीची मागणी

पनवेल दि. २९ ( वार्ताहर ) : गरजेपोटी घरे नियमित करण्यासाठी शासनाने आदेश काढला आहे.यासंदर्भात अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 मे असुन अर्ज करण्यासाठी आणखी मुदतवाढ देऊन घरे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कपात करण्याची मागणी पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
       या आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील,सचिव सुदाम पाटील,कॉग्रेसचे नेते अभिजित पाटील यांनी मुखर्जी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गरजेपोटी घरांचा शासनाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून हा निर्णय स्वागतार्ह आहे.मात्र या योजनेत अर्ज करण्यासाठी व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ लागत असल्याने अर्ज करण्याच्या काळावधी आणखी वाढविण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.शासनाने काढलेल्या जीआर नुसार घरे नियमित करण्यासाठी लावलेले शुल्क जादा असल्याने प्रकल्पग्रस्तांनी या योजनेत अर्ज करण्याकडे पाठ फिरवली आहे. याबाबत बोलताना महाविकास आघाडीचे सचिव सुदाम यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी हा निर्णय अतिशय स्वागतार्ह असुन प्रकल्पग्रस्तांनी या योजनेत अर्ज करण्यासाठी आम्ही स्वतः प्रकल्पग्रस्तांमध्ये जनजागृती करणार असल्याचे स्पष्ट केले.शासन स्वरावर देखील घरे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कपात करण्यासाठी आमचे शिष्टमंडळ नगरविकास मंत्र्याची भेट घेणार असल्याचे सुदाम पाटील यांनी सांगितले. 


फोटो- सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी  यांच्याकडे निवेदन देतांना अध्यक्ष बबन पाटील,सचिव सुदाम पाटील,कॉग्रेसचे नेते अभिजित पाटील.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...
Image