तरुणी बेपत्ता
पनवेल दि, २२ ( वार्ताहर): कळंबोली वसाहती मध्ये राहणारी एक २४ वर्षीय हि तरुणी कोणास काही एक न सांगता कोठे तरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कु. कोमल सुनील चव्हाण( वय २४), बांधा सडपातळ, उंची ५फूट ४ इंच , केस काळे, रंग गोरा, चेहरा उभट, नाक साधारण असून अंगामध्ये लाल रंगाचा कुर्ता आणि काळा लेहेंगा घातला आहे या तरुणी बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किवा महिला पोलीस नाईक रेखा देसाई यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो - कोमल चव्हाण