कोळखे येथे सरपंच मिनल रोहन म्हात्रे यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप ..
कोळखे येथे सरपंच मिनल रोहन म्हात्रे यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप 

पनवेल / प्रतिनिधी : माजी आ.विवेक पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोळखे ग्रामपंचायतीच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना सरपंच मीनल रोहन म्हात्रे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या शाळेत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकापचे पनवेल महानगर चिटणीस आणि नगरसेवक गणेश कडू ,  उपसरपंच दिगंबर पाटील , सदस्य रोहन म्हात्रे , गणेश जाधव , माजी उपसरपंच दिनकर मुंढे , मुख्याध्यापक मेहेतर आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना सरपंच मीनल म्हात्रे म्हणाल्या की , विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात आजपासून होत आहे. त्यांनी आपली प्रगती करताना कोणतेही संकट येऊन न देण्याची जबाबदारी आमची आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गरीब घरातील विद्यार्थी जरी शिक्षण घेत असले तरी त्यांना शालेय जीवनात कसलीही कमी पडू देणार नसल्याचेही त्या म्हणाल्या. तर  अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकेपणाने काम करत राहा या यश नक्कीच पदरात पडेल हा विचार घेऊन पुढे जाण्याची सूचना त्यांनी यावेळी शेवटी केली. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोहन म्हात्रे विद्यार्थ्यांचे स्वागत करत  केले. 
Comments