लाखो रुपये किमतीच्या गुटखा, पानमसाला सह टेम्पो हस्तगत ; दोन आरोपीस अटक..
पनवेल दि. २१ ( संजय कदम ) : लाखो रुपये किमतीच्या गुटखा, पानमसाला सह टेम्पो केला गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल ने हस्तगत केला असून या प्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे .
नवी मुंबई पोलीस आयुकालय नशामुक्त व गुटखा, पानमसालमुक्त होण्याच्या अनुशंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पोलीस आयुक्त विपीनकुमार सिंग यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली "नशामुक्त नवी मुंबई मोहीम राबवण्यात येत आहे. "नशामुक्त नवी मुंबई मोहीम" कार्यक्षमपणे रावबून अवैध प्रतिबंधीत गुटखा व तत्सम पदार्थ विक्री व वाहतुक करणा-या व्यक्तीवर कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त विपीनकुमार सिंग, सह. पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश धुर्य, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुरेश मैगडे यांनी आदेशीत केले होते.
"नशामुक्त नवी मुंबई मोहीम" प्रभाविपणे राबविण्याचा अनुशंगाने सहा. पोलीस आयुक्त सो. विनायक यत्स यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गिरीधर गोरे गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल नवी मुंबई यांचे नेतृत्वाखाली कार्यवाही करीत असताना गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल नवी मुंबई चे पो.उप.निरी, वैभव रोगे, पो.हवा. अनिल पाटील यांना मिळालेल्या गोपनिय बातमीनुसार तळोजा एम.आय.डी.सी. परीसरातुन एक इसम टाटा योद्धा टेम्पो ने अवैधरित्या विमल गुटखा व सुगंधीत पानमसाला ची वाहतुक करणार असल्याची खात्रिशीर माहीती मिळाली होती. त्या अनुशंगाने गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल नवी मुंबई ये पथकाने आय.जी.पी.एल. नाका तळोजा सापळा लावून रात्री 12.30 वा. च्या सुमारास मिळालेल्या बातमीनुसार एक टाटा योद्धा टेम्पो ताब्यात घेण्यात आला. सदर टेम्पो अधील इसमांकडे चौकशी केली असता सदर टेम्पोमध्ये विमला गुटखा व सुगंधीत पनमसाला असल्याचे त्यांनी सांगितले. सदर वाहनातील दोन्ही इसमांचे ताब्यातील टैम्पो मधील सुमारे 5,00,000/- रु. किंमतीचा विमल गुटखा व सुगंधीत पानमसाला जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन व त्यांचे मोबाईल फोन असा एकूण 11,00,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जस करण्यात आला आहे. सदर आरोपीविरुद्ध तळोजा पोलीस ठाणे, नवी मुंबई गु.रजि. क्र. 169/2022 अन्नसुरक्षा मानदे अधिनियम 2006 मधील कलम 26(2)(आय), 26(2)(आय. व्ही) व कलम 27 (2) (ई), 59(2), भा.दं.वि. कलम 188,272,273,328 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्ह्यात सचिन साहेबराव गांगुर्डे, वय-32 वर्षे, रा. पालेखुर्द, पो. देविचा पाडा, तळोजा, ता. पनवेल, मिथुन चंद्रशा शेट्टी, वय 33 वर्षे, रा. रुम नं. 102, बलराम रेसीडेन्सी, तळोजा फेज-01, त. पनवेल, जि. रायगड. मुळ गाव- घर क्र. 407, कासिमाट हाउस, पो. विट्टल, ता. बंटवाल, जि. दक्षिण कर्नाटक, राज्य कर्नाटक,आरोपींना अटक करण्यात आली आहे. वरील दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करुन मा. प्रथमवर्ग न्यायालय, पनवेल येथे हजर केले असता दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी मंजुर केली असुन गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल नवी मुंबई पुढिल तपास करीत आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. संदिप गायकवाड, प्रविण फडतरे, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, सुदाम पाटील, पो. हवा. अनिल पाटील, मधुकर गडगे प्रशांत काटकर, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, सचिन पवार, जगदिश तांडेल, राजेश बैकर, पो.ना. दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रुपेश पाटील, निलेश पाटील, सचिन म्हात्रे, राहुल पवार, अजिनाथ फुंदे, प्रफुल्ल मोरे, नंदकुमार ढगे, अभिजित मे-या, पो.शि. संजय पाटील, प्रविण भोपी, विक्रांत माळी यांनी केली आहे.
फोटो - संबंधित गुन्ह्या संदर्भात माहिती देताना पोलीस अधिकारी