शिवसेना पुन्हा एकसंध व्हावी यासाठी केदार दिघे यांची शक्ती स्थळावर प्रार्थना..

शिवसैनिकांना बळ देण्याचे स्व.आनंद दिघे यांच्या चरणी साकडे

ठाणे :- आज ज्या परिस्थितीतून शिवसेना जात आहे ते पाहता सामान्य शिवसैनिकाला प्रचंड यातना होत आहेत.शिवसेना एकसंध राहिली पाहिजे,दिघे साहेबांना देखील असे प्रकार अपेक्षित नसते.या कठीण काळात शिवसेना पक्ष पुन्हा एकजुटीने मजबुतीने उभा रहावा अशी प्रार्थना स्व. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शक्तीस्थळावर जाऊन केली.
सामान्य शिवसैनिक आजही शिवसेना पक्षाशी प्रामाणिक आहे.निष्ठावंत शिवसैनिक कधीही पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जात नाही. पक्षाचे हित कशात आहे हे नेतृत्वाला माहित असते,त्यामुळे पक्षाने कोणती भूमिका पक्ष हितासाठी घ्यायला हवी हे पक्ष नेतृत्व त्या त्या वेळी ठरवत असते.पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसैनिक काम करतो.त्यामुळे आज जी काही भूमिका काही लोकांकडून घेतली गेली आहे आणि त्यामुळे जी स्थिती शिवसेनेत निर्माण झाली आहे ती दुर्दैवी आहे असे केदार दिघे म्हणाले.या कठीण काळात शिवसेनेतील वातावरण पुन्हा पूर्ववत व्हावे व एक कुटुंब असणारी शिवसेना पुन्हा मूळ स्वरूपात ताकदीने उभी रहावी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेनेची वाटचाल यापुढेही सुरू रहावी यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळी शक्ती स्थळ येथे जाऊन केदार दिघे यांनी प्रार्थना केली. दिघे साहेबांनी सामान्य शिवसैनिकाला बळ द्यावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.दिघे साहेब या संकट काळातून शिवसेनेला नक्की बाहेर काढतील,जे वादळ आले ते शमेल असा विश्वास केदार दिघे यांनी यावेळी व्यक्त केला.
Comments