पनवेल महानगरपालिका अंतर्गत शहरी व ग्रामीण परिसरातील पावसाळी कामांची पाहाणीसाठी संयुक्त समन्वय समिती स्थापन करण्याची शिवसेना पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांची मागणी
पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांची मागणी 
पनवेल दि.०६ (वार्ताहर):   पनवेल महानगरपालिका अंतर्गत शहरी व ग्रामीण परिसरातील पावसाळी सार्वजनिक कामांची पाहाणीसाठी संयुक्त समन्वय समिती स्थापन करण्याची शिवसेना पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

 या निवेदनात  शिवसेना पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांनी म्हटले आहे की, सिडकोच्या खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल, व इतर ग्रामीण विभाग पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यांत आलेला आहे, या सिडको विभागात पनवेल महानगरपालिकेने आपले कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी साफसफाई गार्डन, रस्ते, फुटपाथ पार्किंग, हाउसकिपीग, सिवर लाईन, नुतणीकरण, देखभाल तसेच पावसाळी रस्त्यावरील डेनेज, नाले गटारे साफसफाई, तसेच तलाव पाणवठे, अशी कामे सिडकोच्या मार्फत केली जात होती सदरची कामे ही फक्त आणि फक्त स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देण्यांत येत असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या रोजी रोटीचा प्रश्न काही काळ सुटला होता. सदरची पावसाळी कामे मे महिन्यापूर्वी पूर्ण करणेचा असा अलिखीत पायंडा होता व आहे. सध्या पनवेल महानगरपालिका लोकप्रतिनिधीचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे नवीन निवडणूक होईपर्यत मा. आयुक्त, पनवेल महानगरपालिका, हे प्रशासक म्हणून दैनदिन कारभार आपल्या व इतर अधिका-यांच्या मार्फत पाहाणार आहेत, यापूर्वी पनवेल महानगरपालिका समाविष्ट झालेल्या विभागातील अंतर्गत सर्व पावसाळी कामे सिडको मार्फत मे महिन्यापूर्वी सिडको तर्फे अनेक स्थानिक प्रकल्पग्रस्तांना विभागून देवून पूर्ण करण्यांत येत होती व एकाच वेळी पावसाळा सुरू होण्यांपूर्वी सर्वत्र सुरू करण्यांत येत होती त्यावेळी अनेक कामांवर हजारो मजूर काम करीत होते सध्या पनवेल महानगरपालिकेमध्ये सिडको विभागातील नागरी सुविधा हस्तांतर केल्यामुळे पनवेल महानगरपालिका समाविष्ट झालेल्या विभागातील अंतर्गत कामे पहील्यांदाच खाजगी ठेकेदारांच्या मार्फत करणार आहेत यावावत संयुक्त कमिटीची बैठक वोलावून या ज्वलंत प्रश्नावर चर्चा, विचार विनिमय होणे आवश्यक व गरजेचे झालेले आहे अन्यथा नागरीक अपयशाचे खापर महानगरपालिका प्रशासनावर फोडून मोकळे होतील तरी पनवेल महानगरपालिकेला सिडकोच्या अंतर्गत भागांची इथवूथ माहिती नसल्यामुळे पनवेल महानगरपालिकेने सिडकोच्या अधिका यांशी समन्वय साधून कामे बिना विलंब सुरळीतपणे कशी पूर्ण करता येतील याची माहिती घ्यावी तसेच पनवेल महानगरपालिकेने प्रशासना बाबतचा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवू नये अशी विनंती आहे, जेणे करून पावसाळयात पनवेल महानगरपालिका व सिडकोग्रस्त नागरीकांना पावसात अक्षम्य त्रास होणार नाही अशे त्यांनी मागणी केली आहे 
फोटो: भरत पाटील.
Comments