पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांचा उपक्रम ; गरजू विद्यार्थ्यांना वहयांचे वाटप..
गरजू विद्यार्थ्यांना वहयांचे वाटप..

पनवेल/प्रतिनिधी
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅड. मनोहर सचदेव यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडघे येथील विद्यार्थ्यांना वहयांचे वाटप करण्यात आले.

यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष  निलेश सोनावणे यांनी सांगितले की, गरीब व गरजू मुले  शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशानेच हा वहया वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व झुलेलाल ट्रस्ट यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. लॉकडाऊनच्या काळातही संयुक्तरित्या धान्य वाटप अनेक ठिकाणी करण्यात आले. तसेच महाड दरडग्रस्त भागात जावून जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही समितीतर्फे करण्यात आले. आपत्तीमध्ये सापडलेल्या नागरिकांना तात्काळ कशी मदत मिळेल यासाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विष्णू  जोशी, माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील, गजानन जोशी, मुख्याध्यापिका उज्वला पाटील, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष तथा आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा, समितीचे प्रसिध्दीप्रमुख तथा वार्तांकन साप्ताहिकाचे संपादक संतोष सुतार, पत्रकार राजेंद्र कांबळे, जागृती फाऊंडेशन चे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे, अमित कांबळे आदी उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांनी अ‍ॅड. मनोहर सचदेव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली.
Comments