पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल येथे जाणीव सामाजिक सेवा संस्थेचा शुभारंभ ..
जाणीव सामाजिक सेवा संस्थेचा शुभारंभ 

पनवेल / वार्ताहर : -  ५ जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून "जाणीव या सामाजिक सेवा संस्थेचा" शुभारंभ सोहळा घरगुती स्वरूपात नवीन पनवेल येथे बांठीया विद्यालयात संपन्न झाला.कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख वक्ते निसर्ग मित्रचे डॉ. आशिष ठाकूर यांनी दैनंदिन जीवनातील पर्यावरण संतुलन कसे ठेऊ शकतो याचे छान मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि ज्येष्ठ विश्वस्त डॉ सतीश उमरीकर यांनी त्यांच्या नेहमीच्या खुमासदार शैलीत आपले मनोगत व्यक्त केले आणि मार्गदर्शनही केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, महाराष्ट्र टाईम्स ने गौरविलेल्या पनवेल मधील मनिष जोशी आणि अमोल साखरे या दोन पर्यावरण दुतांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी त्यांनी त्यांच्या उपक्रमाबाबत उपस्थितांना माहिती दिली. 
कार्यक्रमासाठी असलेल्या प्रमुख पाहुणे यांना रोपटे देऊन सन्मान करण्यात आला तसेच सर्व उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विजय गोरेगांवकर यांनी संस्थेची उद्दिष्ट्ये आणि भविष्यातील कार्यक्रम याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली.सौ. अक्कलकोटे यांनी खूप बारकाईने स्वतः तयार केलेली शपथ उपस्थितांना दिली. छोटेखानी पण छान घरगुती आणि पर्यावरण पूरक सोहळ्याद्वारे आज जाणीव चा शुभारंभ झाला. या सोहळ्यास पनवेल, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक पर्यावरण प्रेमी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संस्थेतील अनेक मंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमाच्या पूर्व संध्येला निसर्ग मित्र या संस्थेसोबत फळ झाडांच्या बियारोपण व वृक्षारोपण कार्यक्रमात जाणीवच्या काही सदस्यांनी सहभाग घेतला.  
संस्थेच्या  ध्येयाप्रमांणे पाणी, स्वच्छता, पर्यावरण यांचबरोबर शिक्षण, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, विधी अशा विविध क्षेत्रातील उपक्रम हळू हळू आणि प्रत्यक्ष कृती करून हाती घेण्याचे नियोजन आहे.
Comments