५,७२००० /- किमतीचा मुद्देमाल हस्तगत
पनवेल दि.२७ (संजय कदम): ट्रेलर वाहनांचे टायर चोरी करणाऱ्या टोळी कडून पिकअप टेम्पोसह चोरीचे टायर असा मिळून 05,72,000/- किमतीचा मुद्देमाल पनवेल तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे.
टाटा मोटर्स, बच्चु डिझेल अधिकृत सर्विस सेंटर, आजिवली, शेडुंग बायपास रोड, पनवेल येथून अज्ञात इसमांनी उभ्या असलेल्या ट्रेलरचे 3 टायर चोरी केल्याबाबतची फिर्याद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तुत गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार सुनील कुदळे, महेश धुमाळ, पोलीस नाईक पंकज चांडिले, प्रकाश मेहेर, राकेश मोकल व पथकाने करून तपासादरम्यान घटनास्थळाचे शेडुंग बायपास टोलनाका,पनवेल परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केल्यानंतर गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळवली की,सदर आरोपी हे पिक अप टेम्पोसह भंगारपाडा,पनवेल येथे ट्रेलर वाहनाचे टायर चोरी करण्याकरीता येणार आहेत. सदरची माहिती तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकास देवुन पथकाने बातमीदारासह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला.काही वेळानंतर भंगारपाडा येथे रस्यावर एक पिकअप टेम्पो उभा राहीला.बातमीदाराचे इशाऱ्यावरून पथकाने सदर पिकअप टेम्पोला घेराव घालून त्यातील 03 इसमांना जागीच ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना प्रस्तुत गुन्ह्यात अटक करून गुन्हयात वापरलेला पिकअप टेम्पो हस्तगत केला.तदनंतर आरोपीकडे केले चौकशीत त्यांचा मुख्य साथीदार हा भोसरी जि. पुणे येथे रहावयास असल्याचे समजल्याने तात्काळ त्या पथकाने सदर ठिकाणी रवाना होऊन पाहीजे आरोपीस तांत्रिक तपासावरून अटक केली व गुन्ह्यात चोरलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. यात ५,००,०००/- रु.कि.चा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो, ६९,०००/- रु.कि.चे अपोलो कंपनीचे 03 टायर, १,५००/- रु.कि.ची नट-बोल्ट खोलण्याची मशीन, १,०००/-रु.कि.चा लोखंडी जॅक, ५,००/-रु.कि.चे लोखंडी पान्हे असा एकूण 05,72,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर या मध्ये विकास रामप्रसाद डोंगरे, वय 25 वर्षे, व्यवसाय-चालक, राह. हनुमान मंदीराच्या बाजुला, रूम नं. 277, बालाजी नगर, भोसरी, पुणे, विशाल सुभाश पवार, वय 19 वर्षे, व्यवसाय-हमाल, राह. कविता टी स्टॉल मध्ये, सेक्टर-7, भोसरी, पुणे. मुळ पत्ता - रा. खरडी तुरकाबाद, ता.गंगापुर, जि. औरंगाबाद, वैभव सुनिल खळगे, वय 22 वर्षे, व्यवसाय- नाही, राह. गाव-पिपंळखेड, ता. वडवली, जि. बीड, राजेश शशीराव नागापुरे. वय 31 वर्षे, रा. श्री निवास, गंगोत्री हाॅस्पिटल, जाधववाडी, पो. चिखली जि पुणे, मुळ रा.मुपो.बौध्दपुरा ता. अचलपुर, जि. अमरावती. यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीवर यापूर्वी भोसरी पोलीस ठाणे, जि. पुणे, गु.रजि. क्र 360/2021.भादवी कलम 379,34., भोसरी पोलीस ठाणे, जि. पुणे, गु.रजि. क्र. 361/2021.भादवी कलम 379,34. असे गुन्हे दाखल आहेत
फोटो: हस्तगत केलेला गुन्ह्यातील टेम्पो