सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा...
लढवय्यापणा आणि संघर्ष करणारा रामेश्वर -- आ. बाळाराम पाटील

पनवेल/प्रतिनिधी -- काही तरी वेगळ करणारी माणस हे वेगळी असतात त्यांचे ध्येय, तत्व, विचार जरा हटके असतात, त्यामध्ये असे व्यक्तीमत्व असणारे करंजाडे ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर आदर्श सरपंच रामेश्वर आंग्रे. काही व्यक्तींच्या रक्तातच मुळात लढवय्यापणा आणि संघर्ष करण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे अशी मंडळी आव्हानाला आव्हान करून सामोरे जातात. यशापयशाची पर्वा न करता सातत्याने मार्गक्रमण करत असतात असे मत मंगळवारी ता.19 रोजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वाढदिवसानिमिताने कोकण शिक्षक मतदार संघ आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी कोकण शिक्षक मतदार संघ आमदार बाळाराम पाटील, मा. पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, प्रल्हाद केणी, अनिल केणी, राम पाटील, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, सदस्य मंगेश बोरकर, ग्रामसेववक प्रेमसिंग गिरासे शिरवी समाज, करंजाडे रहिवाशी, महिला सदस्य व ग्रा.सदस्य यांच्यासह जेष्ठ नागरिक, महिला मंडळ, विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्तित होते.

करंजाडे ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी करंजाडे येथे आर.सी.सी पाण्याची साठवण टाकीचे उद्घाटन आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर सी.एस.आर.फंड अंतर्गत टाटा पॉवर कंपनीमार्फत रायगड जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीकरण तसेच नवीन वर्ग खोल्या बांधण्यात आले. १० टक्के महिला बालकल्याण अंतर्गत सुमारे 70 महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच आदीवासी बांधवाना वनशेतीसाठी फळ रोपे वाटप करण्यात आली. यावेळी येथील नागरिकांनी बोलताना सांगितले की, रामेश्वर आंग्रे यांना उदंड आयुष्य लाभावेत तसेच पुढील काळात ते जिल्हा परिषद निवडणूक लढवावी किंवा नगरसेवक व्हावेत असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले. करंजाडे येथील रायगड जिल्हा प्राथमिक शाळा करंजाडेमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान करंजाडे येथील शिरवी समाजाकडून महिलांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर साकार अकॅडमीच्या वतीने नृत्य स्पेर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी सरपंच रामेश्वर आंग्रे यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
Comments