सामाजिक कार्यकर्ते संजय जैन यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या वतीने आले गौरविण्यात..

सामाजिक कार्यकर्ते संजय जैन यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या वतीने आले गौरविण्यात
पनवेल / प्रतिनिधी
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विविध संस्था , रोटरी क्लब आणि गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून पनवेल परिसरात कार्य करणारे संजय जैन यांच्या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या वतीने त्यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे .

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन चे प्रेसिडेंट गुरुदेव सिंग कोहली व इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत संजय जैन यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले आहे . आता पर्यत पनवेल परिसरातील अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे .
Comments