अँपल आयपॅड ची चोरी ...
अँपल आयपॅड ची चोरी 

पनवेल दि २०, (संजय कदम): राहत्या घराचा अर्धवट उघडा दरवाजा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किमतीचा अँपल कंपनीचा आयपॅड चोरून नेल्याची घटना शहरात घडली आहे. 
               
ओम देशमुख, इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, टपाल नाका, रूम नंबर ३०४ तिसरा मजला यांच्या घराचा अर्धवट उघडा दरवाजा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किमतीचा अँपल कंपनीचा आयपॅड चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments