पनवेल रेल्वे पोलिसांनी प्रवाशाचा वाचविला जीव..
पनवेल रेल्वे पोलिसांनी प्रवाशाचा वाचविला जीव ...
पनवेल वैभव दि . २९ ( संजय कदम ) :  पनवेल रेल्वे पोलिसांनी आज समयसूचकता दाखवीत एका प्रवाशाचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे. 
             
पनवेल रेल्वे स्थानकात आज सकाळी रेल्वे स्थानकात आलेला प्रवासी नितीन खरात राहणार ऐरोली हा तेथील पोलीस चौकी समोर आला असताना अचानकपणे त्याच्या छातीत दुखत दुखू लागल्याने त्याने माझ्या छातीत दुखत असे बोलून तो कोसळला त्यावेळी तेथे कार्यतत्पर असलेले रेल्वे पोलीस अधिकरी एएसआय रण शेवरे, ASIअशोक गोपाळे,पोलीस हवालदार  जगदाळे, पटेल , माने यांनी तात्काळ त्याच्याकडे धाव घेऊन  सदर इसमास प्रथमोपचार देऊन त्याला छातीवर पंपिंग करून शुद्धीवर आणले व पुढील औषधोपचार साठी पोलीस शिपाई चव्हाण सोबत माने यांचे सह स्टेशन मास्तर यांच्या कडून मेमो घेऊन त्याला हॉस्पिटल येथे रवाना केले आहे.
Comments