समाजामध्ये तेढ निर्माण करणार्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करा ; शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास पेटकर
पनवेल, दि.7 (संजय कदम) ः समाज विघातक व समाजकंटक तसेच समाजामध्ये धार्मिक दृष्ट्या तेढ निर्माण करणार्या दृष्ट प्रवृत्तीच्या समाजकंटकांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
समाजामध्ये तेढ निर्माण करणार्या दृष्ट प्रवृत्तींचा बंदोबस्त करा यासाठी शिवसेना पनवेल तालुकाच्या वतीने संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, व जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या मार्गदर्शनाने तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यातील अधिकारी कचरे व कुंवर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, नविन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, लीलाधर भोईर मा.उपमहानगरप्रमुख, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प बाळाराम बुवा म्हात्रे, ह भ.प प्रकाश बुवा भोईर, दिलीप पाटील (मा.सरपंच), थोरवे मा.नगरसेवक प्रवीण पाटील शाखाप्रमुख, प्रशांत महाडिक उपशाखा प्रमुख, अरविंद कासारे शाखा प्रमुख, उपस्थित होते. या निवेदनात तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी म्हटले आहे की, वळवली गावच्या हद्दीत समाजविघातक दृष्ट प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी गोमाता व बैल चोरुन त्यांची निर्घृण हत्या केली आहे. अशीच घटना दोन वर्षापूर्वी सुद्धा या परिसरात घडली आहे. तरी यासंदर्भात खांंदेश्वर पोलिसांनी सखोल चौकशी करून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणार्या समाज कंटकांविरोधात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.