महाराष्ट्रात प्रथमच एचएम मोटार्सच्या माध्यमातून हिरो मोटार सायकल व स्कुटर सर्व्हिस आपल्या दारी हि अनोखी सेवा - मा.विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे
हि अनोखी सेवा - मा.विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे

पनवेल दि.२६ (संजय कदम) : देशात दुसरे व महाराष्ट्रात प्रथमच एचएम मोटार्सच्या माध्यमातून हिरो मोटार सायकल व स्कुटर सर्व्हिस आपल्या दारी हि अनोखी सेवा आजपासून सुरु झाली असून त्याचा फायदा सर्व मोटार सायकल धारकांना होणार आहे. यामुळे गाडीमालकांचे वेळ, पैसा व पेट्रोलची बचत होणार आहे त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच होईल असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सदर सेवेच्या उदघाटनाप्रसंगी केले. 
यावेळी मा. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह झोनल सर्व्हिस हेड दिनेश खंडेलवाल, एचओ स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अजय रैना, व्यवस्थापक आशिष धौंडियाल, एचएम मोटर्सचे मालक मनोज सुचक, सुनील सुचक, सीईओ हर्षल सुचक, सीईओ सिद्धार्थ सुचक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना झोनल सर्व्हिस हेड दिनेश खंडेलवाल यांनी सांगितले कि, प्रायोगिक तत्वावर हि सेवा सुरु केली असून एका वेळी १५ ते १६ गाड्यांचे सर्व्हिसिंग व इतर छोटी मोठी कामे करण्यात येणार आहे. सदर गाडी हि त्या-त्याठिकाणी जाऊन हि सेवा देणार असल्याने त्याचा फायदा गाडीमालकांना होणार आहे. तसेच आगामी काळात हि सेवा जास्तीत जास्त देणार असल्याचे त्यांनी सांगितले.   
फोटो : एचएम मोटार्सच्या माध्यमातून हिरो मोटार सायकल व स्कुटर सर्व्हिस आपल्या दारी सेवा सुरु
Comments