श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद - परेश ठाकूर
श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद - परेश ठाकूर
पनवेल / वार्ताहर : - श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे भाजपाचे युवा नेते,पनवेल महानगरपालिकेचे माजी पक्षनेते परेश ठाकूर यांनी पनवेल येथे सांगितले
      पनवेल शहरातील श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेल महानगरपालिका हद्दीतील १० शाळांतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप पनवेल येथील श्री साईबाबा मंदिर येथे करण्यात आले त्यावेळी परेश ठाकूर बोलत होते.
        या कार्यक्रमास माजी नगरसेवक अजय बहिरा , तेजस कांडपिळे , श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी, सेक्रेटरी रामलाल चौधरी ,उपाध्यक्ष राम थदानी उपस्थित होते.
      यापुढे बोलताना परेश ठाकूर म्हणाले , सामाजिक बांधिलकी म्हणून अखंडपणे हा शैक्षणिक उपक्रम राबविला जात आहे.या शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थ्यांनी मनापासून मोठं व्हावं .हा शैक्षणिक उपक्रम राबवून समाजाला सोबत घेऊन जाण्याचे काम श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे ही पनवेलकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले .     
         श्री साईबाबा मंदिर पनवेल येथे  पनवेल शहर,कोळेश्वर विद्या मंदिर, मोठा खांदा, धाकटा खांदा,तक्का,पोदी, गुजराती,उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
        याप्रसंगी १० शाळांतील  शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे या शिक्षकांना शिर्डी यात्रेचेही आयोजन श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे अशी माहिती श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी रामलाल चौधरी ,उपाध्यक्ष राम थदानी यांनी दिली.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image