पनवेल परिसरात दोघांची आत्महत्या..
पनवेल परिसरात दोघांची आत्महत्या


पनवेल दि. २६ ( वार्ताहर ) : पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघा जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
शहरातील सूर्या गेस्ट हाऊस येथे रूम नं.२०१ येथे कोणत्यातरी अज्ञात कारणावरून रूममधील बेडवरील बेडशीटने सिलिंग फॅनला गळफास घेऊन विष्णू एन के (वय २६ वर्षे),  राहणार सुकापूरम केरळ, यांनी आत्महत्या केली आहे. तर दुसऱ्या घटनेत तक्का येथील १८ वर्षीय रोहन बहिरा या तरुणाने गळफास घेतल्याची घटना घडली. त्याने नायलॉनच्या दोरीने वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही आत्महत्येची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.
Comments