पश्चिम बंगाल मधील सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात...
पनवेल दि. १७ ( संजय कदम ) : पश्चिम बंगाल परिसरात गुन्हे करून पनवेल परिसरातील प्रथम उलवा नंतर ओवळे येथे वास्तव्यास राहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या साथीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे .
पश्चिम बंगाल येथील नकाशे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नुकतेच सराईत गुन्हेगार मोतलीफ तारजेन शेख वय ( ३६ ) याने तेथील सोन्याच्या पेढी मध्ये शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकला होता व तेथे लूटमार करून पनवेल परिसरातील प्रथम उलवा नंतर ओवळे येथे वास्तव्यास राहिला होता . त्याच प्रमाणे इतर मोठ्या प्रमाणातील गुन्हे सुद्धा त्याच्या वर दाखल होते .त्यामुळे पश्चिम बंगाल येथील नकाशे पोलीस त्याच्या मागावर होते . दरम्यान सदर सराईत गुन्हेगार पनवेल जवळील ओवळे याठिकाणी एका चाळीत राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या कडे मदत मागितली . यावेळी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध पोउपनि अभयसिंह शिंदे ,पोहवा रविंद्र राऊत,पोना परेश म्हात्रे,पोना महेंद्र वायकर,पोना विनोद देशमुख,पोना रविंद्र पारधी,पोशि विवेक पारासुर,पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने सुरु केला असता तो याठिकाणी सॅनट्रिंगची कामे करत होता याची माहिती मिळताच त्यानुसार सापळा रचुन त्याला ताब्यात घेऊन पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
फोटो- गुन्हेगार मोतलीफ तारजेन शेख