स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा..
पनवेल / वार्ताहर : - भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालया समोर दरवर्षी १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अनोख्या प्रकारे साजरा होतो.हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असल्याने व पंतप्रधान मोदींजींनी *हर घर तिरंगा* अभियानाची घोषणा केली होती त्याला अनुसरून विक्रांत पाटील यांनी आपल्या प्रभागात घरटी एक असे ४००० तिरंग्याचे वाटप केले.आजच्या 'अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या' सोहळ्याचे वैशिष्ट्य सुद्धा आगळे वेगळे होते.आजच्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने परमआदरणीय संन्यासिनी १००८ श्रीमहंत तपोमुर्ती परमहंस सद्गुरु श्री वेणाभारती महाराज, कपिकूल सिद्धपिठम नाशिक.यांची विशेष उपस्तिथी लाभली व त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.यावेळी गुरूंचे प्रवचनरुपी आशीर्वाद जमलेल्या नागरिकांना लाभले.आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विक्रांत पाटील यांनी केले व हर घर तिरंगा अभियान आणि अखंड भारत या विषयावर आपले मनोगत मांडले.या प्रसंगी मा.कोकण म्हाडा सभापती व भाजपा प्रदेश कार्यकरणी सदस्य श्री बाळासाहेब पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.